पनवेल : वार्ताहर
सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून महिला सुरक्षेच्या प्रश्नासाठी रेल्वे पोलिसांना पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
22 डिसेंबर 2020 रोजी घडलेला एक दुर्दैवी प्रकारामुळे रेल्वेने प्रवास करणार्या नवी मुंबईतील असंख्य महिला किती सुरक्षित आहेत, असा सवाल ट्रस्टच्या राष्ट्रीय अध्यक्षा शितल शिवाजीराव मोरे यांनी पत्राद्वारे रेल्वे पोलिसांना विचारला होता. त्या प्रकरणाचा पूर्ण छडा लावला आणि भविष्यात अशी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना केल्यात ते पाहण्यासाठी आणि सगळ्या शंकांचे निरसन करण्यासाठी वाशी रेल्वे पोलिसांकडून बोलावणे आले होते.
ट्रस्टच्या अध्यक्षा शितल मोरे आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिकेत आवटे पोलिसांना भेटीस गेली असता, त्या मुलीचे जवाब व त्यावर केली गेलेली कार्यवाही सविस्तर दस्तऐवज दाखवण्यात आले आणि उपस्थित शंकांचे निरसन करण्यात आले. अनेक महिला कामानिमित घराबाहेर पडतात, सोयीचा प्रवास करण्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करतात. वाशी रेल्वे पोलिसांनी केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना, सकाळी व संध्याकाळी गर्दीच्यावेळी व्हीजीबल पोलीसिंग करणे, जास्तीत जास्त पोलीस अंमलदार यांना गणवेषामध्ये फलाटावर महिलांच्या डब्यासामोर उपस्थित असणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार यांचेही फलाटावर साध्या वेशात सापळयांचे आयोजन करण्यात येते. तसेच रात्री 8 ते सकाळी 6वाजेपर्यंत पोलीस अंमलदार एमएसएफ, होमगार्ड यांना महिलांचे डब्यात लोकल पेट्रोलिंगकामी नेमण्यात येते याबाबतीत माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक ए. सी. आढाव, प्रमुख रायटर देवेंद्र पाटील आणि सौ. म्हात्रे यांनी केलेल्या सहकार्य आणि सकारात्मक प्रतिसाद यासाठी आभार मानले. तसेच समाधान व्यक्त करून ट्रस्टच्या अध्यक्षा शितल शिवाजीराव मोरे यांनी आपला जवाब सुद्धा नोंदवला. महिला सुरक्षा हा खूप संवेदनशील विषय आहे, अजून कोणाला काही मदत हवी असल्यास सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया सोबत संपर्क करू शकता, आपण योग्य ती मदत करण्यास नेहमीच तत्पर असू, अशी माहिती अध्यक्षा शितल मोरे यांनी दिली.