Breaking News

ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम : दरेकर

मुंबई ः प्रतिनिधी
कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण यांनी केली आहे. कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. आता कोकणासाठी परतफेड करण्याची वेळ आली आहे. कोकणाला काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठी हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.
कोकणाला संपूर्ण महाराष्ट्र विकास महामंडळातून वगळून कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणचे आहेत. शिवसेनेलाही कोकणाने खूप दिले आहे. त्यामुळे कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, असे दरेकर म्हणाले. शिवसेना आता फक्त मुंबई आणि कोकणपुरतीच आहे, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
नाणार प्रकल्पात आडकाठी नको
नाणार प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या संदर्भात भाष्य करताना प्रवीण दरेकर म्हणाले की, नाणारमुळे कोकणाचा मोठा विकास होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आडकाठी करू नये. मोठा रोजगार उपलब्ध होणार असेल, तर त्यांनी आपली भूमिका बदलावी, असे आवाहन दरेकर यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राचे दरेकर यांनी स्वागत केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply