खारघरच्या आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींना लस टोचली जात आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 8) करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांनी खारघर येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास भेट दिली.
या वेळी महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, नगरसेवक राजू सोनी, प्रवीण पाटील, निलेश बावीस्कर, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका दर्शना भोईर, संजना कदम, रूचिता लोंढे, भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, प्रभाग 4चे अध्यक्ष वासुदेव पाटील, समीर कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, अजिंक्य जाधव, योगिता कडू, प्रकल्प कार्यवाह राजीव समेळ, खजिनदार ओगले, सुनील लघाटे, प्रसन्न खेडकर, प्रशासकीय अधिकारी सीमा पाटील, भाविन जैन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खारघरमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे म्हणून सन 2018मध्ये पनवेल महापालिकेच्या महासभेत भाजप नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव मांडला होता. त्याची पूर्तता झाली असून, नागरिकांच्या सेवेसाठी खारघर सेक्टर 15मधील प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज झाले आहे. या केंद्राची सुरुवात सोमवारी लसीकरणाच्या मोहिमेने झाली. लसीकरणाची मोहीम पूर्ण झाल्यानंतर किंवा काही दिवसानंतर या केंद्रात नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी अल्प दरामध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये महिलांसाठी प्रसुतीगृहाची सुविधादेखील करण्यात येणार आहे.