Breaking News

कामोठ्यात दोस्त संस्थेतर्फे विविध कार्यक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त

धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फोर सोसिओ हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन दोस्त, मुंबई या संस्थेच्या वतीने सोमवारी (दि. 8) कामोठे येथील सुषमा पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिन तसेच संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी नेत्र तंत्ज्ञ, समाजसेवी, योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात कार्य केलेल्या, तसेच नुकतीच पिएचडी या पदवीने सन्मानित केल्या गेलेल्या डॉ. शुभदा कुडताळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अवयवदान क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या मीरा सुरेश, दोस्त मुंबई संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. वैशाली जवादे तसेच संस्थापक डॉ. कैलास जवादे उपस्थित होते. दोस्त मुंबईच्या विद्यार्थी मंचचे माजी अध्यक्ष ओंकार कोलपकर आणि सचिव शुभम दरगुडे उपस्थित होते.

संस्थेचे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी दोस्त मुंबई विद्यार्थी मंचच्या पदाधिकर्‍यांचा पदग्रहण सोहळा  करण्यात आला. अक्षय गवारे, अभिषेक चिंचपुरे आणि कोमल सिंह यांना अनुक्रमे अध्यक्ष, सचिव आणि कोशाध्यक्ष ही पदे देण्यात आली. फिजिशियन असिस्टंट या क्षेत्रात प्रशिक्षण पूर्ण विद्यार्थ्यांना काम करताना येणार्‍या अडचणींना सोडवण्याच्या दृष्टीने, तसेच त्यांना एकत्र ठेवण्याचा दृष्टीने संस्थेच्यावतीने फिजिशियन असिस्टंट वेल्फेअर ग्रुप तयार करण्यात आला आहे.

या ग्रुपसाठी स्नेहल हंडे, कविता मोरे आणि कोमल सिंह यांना अनुक्रमे अध्यक्ष सचिव आणि कोषाध्यक्ष ही पदे देण्यात आली. या वेळी डॉ. कैलास जवादे यांनी सर्व पदाधिकार्‍यांना संस्थेच्या कार्यासाठी जबाबदारीने काम करण्याची शपथ दिली. संस्थेच्या वतीने आरोग्य कार्यक्रम तसेच औद्योगिक आरोग्य कार्यक्रम होणार आहेत, असे डॉ. कैलास जवादे यांनी सांगितले.

Check Also

दिघाटीत आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त दिघाटी येथील महायुतीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी …

Leave a Reply