आमदार प्रशांत ठाकूर यांचे कळंबोलीत आवाहन
कळंबोली : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसराचा आणखी विकास, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारच सत्तेत यायला पाहिजे. त्यामुळे पनवेलकरांच्या अपेक्षाप्रमाणे विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि तुमचे पाठबळ मला आणि पर्यायाने महायुतीला द्या, असे आवाहन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये झालेल्या भव्य प्रचाररॅलीवेळी केले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार जोरदार पद्धतीने संपूर्ण मतदार संघात सुरू आहे. महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा आपणच उमेदवार समजून आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी होरात्र मेहनत घेत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 10मध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा आणि मतदारांनी विजयी आशीर्वाद दिला. या रॅलीतसुद्धा तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष केला. या रॅलीत शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, आरपीआयचे शहराध्यक्ष मोहन बलखंडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष तुकाराम सरक, भाजपाचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका मोनिका महानवर, माजी लिजल्हा परिषद सदस्या प्रिया मुकादम, भाजप भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक मोटे, सितेंद्र शर्मा, मंडळ सरचिटणीस दिलीप बिस्ट, आबा घुटुकडे, संदीप म्हात्रे, रामा महानवर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गौरव नाईक, यांच्यासह सेक्टर प्रमुख, बिल्डिंग प्रमुख, युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे आदर्शवत ठरली आहेत. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्याकडून विधायक कार्य होतात. त्याचबरोबर सर्व घटकातील व्यक्तींचा आणि त्यांचा ऋणानुबंध असल्याने प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार स्वागत होऊन भरभरून आशीर्वाद मिळत आहे. त्याच अनुषंगाने पनवेल विधासभा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा जयघोष ऐकायला मिळत आहे.