Breaking News

राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत हवे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे महायुतीचे सरकारच राज्यात पुन्हा सत्तेत यायला पाहिजे, असे प्रतिपादन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर पाटीदार समाजाच्या बैठकीत बुधवारी (दि.13) केले.
या बैठकीत खारघरमधील कच्छ कडवा पाटी पाटीदार समाज, कच्छ वागड लेवा पाटीदार समाज आणि सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने आपला जाहिर पाठिंबा आमदार प्रशांत ठाकूरांना जाहिर केला.
पनवेल मतदार संघाचा विकासासाठी सदैव तत्पर असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी विविध संस्था, संघटना तसेच समाजाच्या वतीने पाठिंबा जाहिर करण्यात येत आहे. त्यानुसार खारघरमध्ये झालेल्या पाटीदार समाजाची बैठक झाली. यात आमदार प्रशांत ठाकूर यांना खारघर कच्छ कडवा पाटीदार समाज, कच्छ वागड लेवा पाटीदार समाज, आणि सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने आपला जाहिर पाठिंबा दिला.
या बैठकीला भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, कच्छ कडवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष कांतीभाई पटेल, कच्छ कडवा पाटीदार युवक मंडळाचे अध्यक्ष राजेश छाभैया, कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष जीवाभाई रावत, पाटीदार समाजाचे उपाध्यक्ष जीतुभाई पटेल, सौराष्ट्र लेवा पटेल समाजाचे रमेश सोरठीया, कुनालभाई संघाणी, भानजीभाई पटेल, भाजप सोशल मिडीया सेलच्या सहसंयोजीका बीना गोगरी, युवमोर्चाचे उपाध्यक्ष प्रवीण वेरा यांच्यासह पाटीदार समाजाचे बांधव उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply