Breaking News

शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

अलिबाग शासकीय कार्यालयात जाऊन प्रचार

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग-मुरूड विधानसभा मतदरसंघाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात जाऊन प्रचार केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
चित्रलेखा पाटील या मंगळवारी (दि.12) दुपारी 2 वा. च्या सुमारास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी कार्यालयातील विविध विभागात जाऊन शासकीय कर्मचार्‍यांची भेट घेऊन आपणास मतदान करण्याचे आवाहन केले.
याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळवहिवाट शाखेतील नायब तहसीलदार मनोज गोतारणे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याची दखल घेऊन चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 223 अन्वये अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply