पनवेल : रामप्रहर वृत्त
अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीचे सरकारने फक्त विकासाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले नाही, मात्र महायुतीच्या सरकारने विविध जनकल्याणकारी योजना राबवून जनतेला दिलासा दिला त्यांना विकासाच्या दिशेने नेले त्यामुळे राज्य हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी भाजपा महायुतीला मतदान करा, असे आवाहन भाजप महायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.13) खारघरमध्ये प्रचार रॅलीवेळी केले.
जस जशी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तशी पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांचा प्रचाराला वेग आला आहे. महायुतीचे पदाधीकारी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देत त्यांना येत्या निवडणुकीत कमळासमोरील बटन दाबून भरघोष मताधिक्याने विजयी करण्याचे आवहन करत आहेत. त्याअंतर्गत खारघर आणि तळोजामध्ये भव्य प्रचार रॅली बुधवारी
काढण्यात आली.
या रॅलीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला तसेच युवा तरुणांनीदेखील मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभागी होत आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष करून विजयी करण्याचे आवाहन केले. या रॅलीत भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भाजपचे पनवले शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, वासुदेव घरत, प्रभाकर जोशी,
निर्दोश केणी, महिला मोर्चाच्या खारघर शहर अध्यक्षा साधना पवार, उमेश चौधरी, विनोद घरत, सचिन वास्कर, जयदास तेलवणे, प्रल्हाद गायकर, जागदीश घरत, साजीद पटेल, मस्नूर पटेल, जिशाद पटेल, संतोष पाटील, संतोष भोईर, जया घरत, संतोष घरत, रवी घरत, हरिश्चंद्र जोशी, प्रविण घरत, प्रल्हाद गायकर, रोहित पाटील, जगदीश घरत, विशाल घरत, अनिरुद्ध जोशी, विशाल जोशी, संदीप वास्कर, रणजीत घरत, गणेश जोशी, दीलीप कडू, तेजस पाटील, मानीक म्हात्रे, प्रभाकर खांदेकर, विवेक जोशी, मच्छींद्र कोळी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, शुभ पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …