पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक बांधिलकीची अतूट नाळ जुळलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संघटना, संस्थांचा वाढते समर्थन मिळत आहे. यामध्ये आता बृहन महाराष्ट्र तेली समाजा व सर्व बंजारा समाजानेही आपला पाठिंबा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन जाहीर केला.
या संदर्भातील पाठिंबा पत्र बुधवारी (दि.13) महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने प्रदेश सचिव दिलीप खोंड, सामाजिक कार्यकर्ता अजित पवार, सदस्य क्षीरसागर यांनी व सर्व बंजारा समाजातर्फे देण्यात आले. या वेळी तेली समाजातील मतदारांनी पनवेल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे, असे आवाहन प्रदेश सचिव दिलीप खोंड यांनी केले.
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, बंजारा समाजाचे खारघर नायक प्रकाश वडते, पनवेल नायक रुपेश चव्हाण, वसंतराव नाईक, दिनकर राठोड, छगन राठोड, भगवान पवार, गणपत राठोड, रमेश राठोड, प्रकाश राठोड, रवी पांडू राठोड, संतोष राठोड, रोहित राठोड, सुनील जाधव, किरण जाधव, सुभाष राठोड, राजू जाधव, किशोर राठोड, विशाल राठोड, संजय राठोड, करण आडे, प्रकाश राठोड, प्रेम चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रकाश वडते यांनी, पनवेलला विकासाची खरी ओळख करून देणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व समाजाचा कायम चांगला विचार केला आहे. पनवेलचे आमदार म्हणून त्यांनी केलेले काम हे कधीही विसरण्यासारखे नाही, भविष्यातही त्यांच्याकडून विकासाचा ओघ कायम राहणार आहे, त्यामुळे पुन्हा ते प्रचंड मतांनी विजयी होणे हे सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे. त्यांचा समाजावर असलेले प्रेम आम्ही पाहिलेले आहे, त्यामुळे संत सेवालाल महाराजांना आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, नमूद केले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …