Breaking News

आर्या वनौषधी संस्थेतर्फे विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

जागतिक महिला दिनानिमित्त आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने पनवेल, पालघर येथे वृक्ष वाटप, वृक्ष रोपण, वृक्षांचा वाढदिवस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.                    

या कार्यक्रमास पत्रकार संजय कदम, आर्या प्रहरचे पालघर जिल्हा प्रतिनिधी राजेश संखे, अतुल वझे, मुकेश सिंह, अमेय पिंपळे, संतोष कोरे, जितेंद्र सावे, हरेश जळे, विलास घरत, विक्रम येवले, नितीन जोशी आदी उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी महिलांसाठी उपयुक्त अशा रिठा, धायटी, सीतेचा अशोक, कांचनार, शतावरी आदी औषधी वनस्पतींची सखोल माहिती दिली. या आगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांस महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.

या वेळी मेघना कदम, मानसी जामकर, नलिनी तटकरे, मनाली म्हात्रे, शकुंतला म्हात्रे आदी महिलांना सीतेचा अशोक, ब्राम्ही, गुडमार, कडू चिरायता, दमवेल, अश्वगंधा, शतावरी आदी औषधी रोपे वाटप करण्यात आली. महिला दिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या मौसमी तटकरे, प्रियांका पाटील आदी महिलांना या वेळी सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. नेरे येथील स्नेहकुंज आधारगृहात संगीता नितीन जोशी यांच्या हस्ते सीतेचा अशोक या वृक्षाचे रोपण करण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply