पनवेल : रामप्रहर वृत्त
दिघाटी येथील महायुतीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या विकासकामांची कार्य अहवाल पुस्तिका घराघरात मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम केले.
जात-पात-धर्म-पंत न मानता नेहमीच विकासाचे राजकारण करणारे आणि उरणचा सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असलेले आमदार महेश बालदी हे पुन्हा उरण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदारसंघात 500 कोटींची विकासकामे करेन, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्यांनी या मतदारसंघात साडेपाच हजार कोटींहून अधिक रकमेची विकासकामे केली आहेत. या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा आमदार होतील, असा ठाम विश्वास मतदारांना आहे.
प्रचार रॅलीवेळी दिघाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच रजनी ठाकूर, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य स्मिता ठाकूर, ज्येष्ठ नेते रामदास ठाकूर, शाळा कमिटी अध्यक्ष विकास पाटील, भाजप नेते चांगाजीशेठ पाटील, भाजप केळवणे पं.स. विभागीय अध्यक्ष हिरामण ठाकूर, रामभाऊ पाटील, अशोक पाटील, राजाराम पाटील, युवा मोर्चा केळवणे पं.स. माजी उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, राजेश ठाकूर, संतोष पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील, नरेंद्र पाटील, प्रितम पाटील आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …