पनवेल : प्रतिनिधी
खारघर सेक्टर 11 मध्ये महिला दिनी महिला पोलीस निरीक्षक आणि महिला डॉक्टरच्या हस्ते विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा झाला. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 4 चे नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या नगरसेवक निधीतून हे विरुंगुळा केंद्र उभारण्यात आले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर येथे सेक्टर 11 मध्ये असलेल्या उद्यानात अनेक दिवस नागरिकांची विरंगुळा केंद्राची मागणी होती. प्रभाग 4 चे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी आपल्या नगरसेवक निधीतून येथील उद्यानात विरंगुळा केंद्र उभारण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते. या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण सोमवारी महिला दिनी खारघर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक विमल बीडवे आणि डॉ. सुविधा म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी स्थायी समिती सभापती प्रवीण काळूराम पाटील, नगरसेवक रामजी बेहरा, भाजप खारघर-तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पप्पू खामकर, तुकाराम कंठाणे आदी उपस्थित होते.