Breaking News

अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या ग्रुपचे सामाजिक भान, बसचालकाची एक लाखाची रक्कम केली सुपूर्द

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी (दि. 3) प्रवासी बसचा अपघात झाला. या वेळी खोपोली पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या बसचालकाने एक लाख रुपये ड्रायव्हर सीटखाली ठेवल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांना दिली. त्यांनी ती रक्कम बस मालकाकडे सुपूर्द केली.

खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीला या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मंगळवारी अपघाताचा मेसेज पडताच सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले, धर्मेंद्र रावळ, हनीफ कर्जीकर, अमोल कदम यांच्यासह पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली. विजय भोसले हे  काही जखमींना घेऊन कामोठे एमजीएम हॉस्पिटलकडे निघाले.

दरम्यान, जखमी चालक मांगीलाल साळवे (रा. गुजरात) यांनी बसचे भाडे आणि खर्चासाठी असलेले सुमारे एक लाख रुपये ड्रायव्हर सीटखाली ठेवल्याची माहिती विजय भोसले यांना दिली. विजय भोसले यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने ती रक्कम ताब्यात घेतली. जखमी चालक साळवे यांनी ते पैसे माझ्या मालकांना परत करा, असे सांगितले. तेव्हा भोसले यांनी ग्रुपचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार ती रक्कम मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे अंमलदार यांच्या समक्ष जाबजबाब लिहून घेत बसमालक दीपेश अमर अहुजा (कोंढवा-पुणे) यांच्याकडे सुपूर्द केली.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply