Breaking News

विक्रांत पाटील यांच्या नगरसेवक निधीतून शिव मंदिराच्या परिसरात सुशोभिकरण

पनवेल : वार्ताहर

कार्यक्षम नगरसेवक तसेच माजी उपमहापौर विक्रांत पाटील त्यांनी आपल्या नगरसेवक निधीतून पनवेल तालुका पोलीस स्टेशन जवळील शिव मंदिराच्या आवारात लोखंडी ग्रील व आणि पत्र्याची शेड बसविण्यात आले आहेत.

विक्रांत पाटील नेहमी आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यास प्राधान्य देत असतात व त्याचबरोबर विकासकामे, तलाव आणि मंदिरांचे सुशोभीकरण हे सुद्धा तेवढ्याच तत्परतेने करून घेतात.तसेच त्यांनी प्रभागातील पनवेल तालुका पोलीस स्टेशन जवळील शिव मंदिराच्या आवारात शिवरात्रीचे औचित्य साधून आपल्या नगरसेवक निधीतून लोखंडी ग्रील व पत्र्याची शेड बसवून दिले.

याबद्दल शिवा विश्वनाथ पावन महादेव हॉलचे अध्यक्ष आणि प्रभागातील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले व जनहितार्थ करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

Check Also

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे …

Leave a Reply