भाजप नेते अरुणशेठ भगत, परेश ठाकूर यांनी केली पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांची 35वी पुण्यतिथी येत्या 7 मे रोजी आहे. यानिमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 30 एप्रिल आणि 1 व 2 मे रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 23) पाहणी केली. त्यांच्या समवेत भाजपचे जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, सुनील कोळी, महादेव कोळी, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिता घरत, कामिनी कोळी, उषा देशमुख, राजकिरण कोळी, चंद्रकांत कोळी, प्रमोद कोळी, विनायक कोळी, अनिल कोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.