पनवेल ः रामप्रहर वृत्त
शिक्षणासह विविध क्षेत्रांत कार्यरत व अग्रेसर असणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने अमन अल्लाउदीन शेख याला एरोस्पेस इंजिनीअरिंग शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यानुसार अमन शेख हा एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अमनचे रविवारी (दि. 14) अभिनंदन केले आणि इंग्लंडमधील कार्डिफ युनिव्हर्सिटी येथील पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. अमनसोबत अल्लाउदीन शेख, रजिया शेख उपस्थित होते. या वेळी बोलताना दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अमनच्या इंग्लंड येथील शिक्षणासाठीदेखील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मदत करण्यात येईल, असे जाहीर केले. याबद्दल अमन शेख याच्या पालकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले आहेत.