Breaking News

महाविकास आघाडी सरकारने वीज ग्राहकांची चेष्टा चालवलीय; राजू शेट्टींचा आरोप; शुक्रवारी ‘महामार्ग रोको’

कोल्हापूर ः प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 19) राज्यभर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. तसेच अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सव्वा दोन कोटी ग्राहकांची चेष्टा चालविल्याचा आरोपही त्यांनी केला. लॉकडाऊनच्या काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी विविध पक्ष व संघटनांनी मागील दोन-तीन महिन्यांपासून आंदोलने केली आहेत. केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी घरगुती वीज बिलांत सहा महिन्यांसाठी 50 टक्के सवलत दिली. कर्नाटक सरकारने रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फळभाजी विक्रेते, बांधकाम, यंत्रमाग कामगारांना रोख मदत दिली, मात्र महाराष्ट्र सरकारने काहीच केले नाही. ही बाब खेदजनक असून, सरकारला जागे करायचे आहे. मागील 19 मार्चला यवतमाळ येथील साहेबराव करपे या पहिल्या शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. त्याच दिवशी राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, वाढीव वीज बिलांविरोधात यापूर्वी भाजपनेही आवाज उठवून आंदोलन केले होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply