Breaking News

मानवनिर्मित वणवे वनविभागाची डोकेदुखी

अलिबाग : प्रतिनिधी : शेती, शिकार आदी कारणांसाठी जंगलात  वणवे लावण्यात येतात.या मानवनिर्मीत वणव्यामंध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत आहे. दुर्मिळ वन्यजीवांच्या जाती देखील नष्ट होऊ लागल्या आहेत. अनेक उपाय करूनही वनवे थांबत नाहीत. हे  मानवनिर्मित वणवे रायगड जिल्ह्यातील वनविभागची डोकेदुखी ठरत आहे.

दरवर्षी जंगलात वणवे लागतात. त्यात प्रचंड नकसान होत असते. याला आळा घलण्यासाठी अलिबाग वन विभागाने फायरब्लॉ या यंत्राचा वापर सुरु केला आहे. त्याचबरोबर वणवे विझविण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या  हॅलो फॉरेस्ट या शीघ्र प्रतिसात देणार्‍या हेल्प लाईनचाही नागरिकांडून वापर केला जात आहे. तरीही वणवे लागण्याचे प्रमाण कमी होत नाहीत. मागील महिनाभरात रायगड जिल्ह्यात 36 ठिकाणी लहानमोठे वणवे लागले आहेत.

दारूभट्टी उभारण्यासाठी जंगल परिसरात वणवे पेटवले जातात. जिल्ह्याच्या ग्रामीण शेतकरी शेतात पिके चांगली यावीत, या उद्देशाने दरवर्षी आपल्या शेतात राब भाजतात. शेताच्या जवळच डोंगर असल्याने शेतातील पालापाचोळ्याची ही आग पसरत जाऊन वणव्याचे रूप धारण करते. शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतातील गवत जाळतात. यामुळेही मोठ्या प्रमाणात वणवे लागत. वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठीही मद्दाम वणवे लावले जातात. या वनव्यांमुळे औषधी वनस्पती, कीटक, जिवाणू, सर्प, पक्षी, सरडे, पाली, ससे, हरणे, कोल्हे, लांडगे  आदी वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

या वणव्यांना आळा घालण्यासाठी उप वनसंरक्षक अलिबाग याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या 11 परिक्षेत्रांना  फायरब्लॉ ही अद्ययावत यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्राद्वारे फायर लाईन मारणे, आग विझवणे यासारखी कामे जलद करता येतात. स्थानिक वन समितीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. याबरोबरच वणवे विझविण्यासाठी वनविभागाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागातर्फे जाळरेषा (फायर लाईन) हा प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात वणवे लागण्याचे प्रमाण कमी होत  होत नाहीत. वणवे वनविभागासाठी डोकदुखी ठरत आहेत.

वनसंपदा धोक्यात

रायगड जिल्ह्यात 35 हजार हेक्टर खाजगी, 1 लाख 7 हजार हेक्टर सरकारी वनक्षेत्र आहे. कर्नाळा, फणसाड ही अभयारण्ये आहेत. यात अत्यंत दुर्मिळ वन्यप्रजातींचे येथे वास्तव्य असते. घुबड, चंडोल, रॉबिन, रानकोंबड्या, मोर, भेकर, बिबटे यांच्यासह काही दुर्मिळ फुलपाखरांच्या जाती रायगडच्या जंगलांमध्ये आढळतात. वनव्यांमुळे त्यांचे अस्तित्व घोक्यात आले आहे. दगडफूल, श्वतांबरी, पानफुटी, टोपली कारवी, रानकेळी, संजीवनी, सर्पंगधा, अश्वगंधा यासारखी वनौषधी आढळतात. वनव्यांमुळे ही जंगलसंपत्ती धोक्यात आली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply