Breaking News

केंद्र सरकारच्या पीएमजी दिशा अंतर्गत आदिवासींसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त

सर्वसामान्य नागरिकांनाही डिजिटल होता यावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून ग्रामीण नागरिकांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने पीएमजी दिशा हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. याच कार्यक्रमांतर्गत श्रीया फाऊंडेशन पाले आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोरळवाडी येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या वेळी वाडीतील प्रशिक्षार्थींची नोंदणी करून त्यांना 10 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणांंनतर आदिवासी बांधवही घरी बसून मोबाइलद्वारे आपले आर्थिक तथा इतर सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करू शकतील. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेऊन उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना भारत सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटरकडून प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती सीएससी सेंटरच्या संचालिका तथा श्रीया फाऊंडेशनच्या अध्यक्ष स्मिता म्हात्रे यांनी दिली. या कार्यक्रमात ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, श्रीया फाऊंडेशनचे विश्वस्त संदीप म्हात्रे, निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. म्हात्रे, निवृत्त पोलीस निरीक्षक सी. के. म्हात्रे, भरत पाटील, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड, जनसंपर्क अधिकारी राजेश रसाळ यांच्यासह लक्ष्मण पवार, दशरथ वाघे, गुरू वाघे, संतोष पवार, शकुंतला वाघे, सुवर्णा वाघे, सोनाली पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply