Breaking News

टी-20 क्रिकेटमध्ये सुबोध भाटीचे द्विशतक

17 षटकार, 17 चौकारांचा वर्षाव

मुंबई ः प्रतिनिधी
टी-20 क्रिकेट ह्या कमी चेंडूंच्या जलद क्रिकेटमध्ये शतक झळकावणे हीदेखील दुर्मीळ गोष्ट मानली जाते. त्याच वेळी दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक कामगिरी त्याने दुसर्‍यांदा केली आहे. दिल्लीतील एका क्लब मॅचमध्ये सुबोधने 79 चेंडूंमध्ये 205 धावा काढल्या. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 17 षटकारांचा वर्षाव केला. याचाच अर्थ त्याने फक्त 34 चेंडूंमध्ये 170 धावा केल्या.
दिल्ली अकरा विरुद्ध सिंबा या लढतीत दिल्ली अकराकडून खेळताना सुबोधने हा पराक्रम केला. या खेळीमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 259 इतका होता. सुबोधच्या द्विशतकामुळे त्याच्या टीमने 20 षटकांमध्ये दोन बाद 256 धावा काढल्या. सुबोधशिवाय सचिन भाटीने 25 धावांचे योगदान दिले. सिंबाला 257 धावांचे आव्हान पेलवले नाही. त्यांची संपूर्ण टीम 199 धावांवरच ऑल आऊट झाली.
टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सुबोध दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply