Breaking News

…तर कोरोना वाढणारच!

प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडली नाही, मास्क वापरला नाही,  तू हो पुढे मी आलोच.. असेच सुरू राहिले तर कोरोना वाढणारच. आपल्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढू लागले आहेत. शासनाला त्यामुळे सोमवार रात्रीपासून नवीन नियमावली लागू करावी लागली. पनवेल महापालिका हद्दीतही सध्या दिवसाला 400 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. आज रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. वर्षभर पोलिस आणि आरोग्य सेवेवर मोठा ताण आहे. त्यातच नवीन रुग्णात झपाट्याने वाढ होऊ लागली. या सगळ्याला नागरिकांचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती सुरू राहिल्यास संपूर्ण  लॉकडाऊन  कारावा लागेल. त्यामुळे अनेकांचे रोजगार जातील, उद्योगधंदे बंद पडतील, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल, अनेक विकासकामे निधी अभावी ठप्प होणार आहेत. वर्षभर शाळा, महाविद्यालये बंद असल्याने व परीक्षाच होत नसल्याने मुलांचे होणारे नुकसान भरून येणार नाही. या कलावधीत पदवी घेणार्‍या तरुणांना नोकरी मिळताना अनेक समस्या येणार आहेत. रविवारी रात्री शासनाने नवीन नियमावली जाहीर केली. तिची अंमलबजावणी सोमवार (दि. 5) रात्रीपासून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या नियमावलीत शासनाने पुन्हा सोमवारी रात्री दुरूस्ती केली. यावेळी अत्यावश्यक सेवात आणखी नवीन काही व्यवसायांचा समावेश केला. सरकारच्या या धरसोड वृतीमुळे नागरिक आणि व्यवसायिकांत ही गोंधळ होताना दिसतो. त्यामुळे मंगळवारी दुकाने बंद करायला गेलेल्या महापालिका कर्मचारी, पोलीस आणि व्यापारी यांच्यात अनेक ठिकाणी वाद झाले. पोलिसांची गाडी अडवण्यात आली. महापालिका प्रभाग कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. सोमवारी रात्री 8 नंतर अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसले. नवीन पनवेल सेक्टऱ 16 मध्ये रात्री 10.30 वाजताही 5-6 तरूण दारू पिऊन व सोबत कुत्रा घेऊन रस्त्यावर ओरडत फिरत होते. नवीन पनवेलमध्ये राहणारे माजी सैनिक रवी पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना नागरिकांचे वागणे पाहून शासनाला उद्या लष्कराला बोलवावे लागले तर काय परिस्थिती उदभवेल, याची दिलेली माहिती निश्चितच विचार करायला लावणारी आहे. इरीळल चरळप ठरवर (इचठ) म्हणजे  बिमार. असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बिमारी ही आहे की, अनास्था मुख्य दोन पातळींवर दिसते. पहिली, विमान तऴावरुन करोना वाहक भले सरकारी  भुलचुकीने त्यांच्या ईप्सित स्थानी गेले. सरकार त्यांच्या मागावर होते आणि आहे. पण आता अनास्था-2 चालू झाले. कोविड-19 वर ताबा मिळवायचा म्हणजे, विषाणूवाहक आणि बिगरवाहक दोघांनी मास्क लावणे अतिशय गरजेचे आहे. इथे मात्र जो तो स्वत:च्या मर्जीने वागताना दिसतो. हे अतिशय चुकीचेच नव्हे तर संपूर्ण घातक आहे. सोसायटीची गल्ली, आजूबाजूच्या परिसरातील झोपडपट्ट्या, चाळी, वाण्याचे दुकान, डेअरी, रस्ते सगळीकडे साधारण 60 टक्के लोक मास्क लावतात. उरलेल्या 40 टक्क्यांपैकी काही जणांचे मास्क नाका-तोंडा ऐवजी मेडल सारखे गळ्यांत असतात. आपण विचारले की, मास्क का लावत नाही तर वैतागून हाताने मास्क हलवून दाखवतात, हे काय? आपली देशभक्ती किंवा परस्थितीचे गांभीर्य याच पातळींवर आहे. माझ्या या शहरात चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 2-3-4 चाकीवाले यथेच्छपणे सिग्नल तोडणे, रॉग साईडने गाडी चालविणे, लेफ्ट फ्री साईड ब्लॉक करणे सर्रासपणे सुरू आहे. त्यांना हात लावायची हिंमत कोणी करताना दिसत नाही. कारण काय असावं? ही आपली अंमलबजावणी पातळी आहे. आहोत ना आपण सारेजण स्मार्टसिटीकर! तर, आता अनास्था-2 प्रमाणे जर 40 टक्के लोक मास्कचे उल्लंघन करणारे असतील तर या महान देशातील 50-60 कोटी जनता पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, डॉक्टर, शास्त्रज्ञ यांचे न ऐकता या नाजूक क्षणी आपले उपद्रवमुल्य वापरणार असेल तर कोविड-19ला प्रशासन किती आणि कसा, कधीपर्यंत अटकाव करू शकेल? आमच्या एअरफोर्समध्ये एक सुविचार लिहिलेला असे, थए थजठघ कअठऊ, थए डथएअढ जणठ इङजजऊ खछ झएअउए डज ढक-ढ थए इङएएऊ ङएडड ऊणठखछॠ थअठ. साहेब, हे जे कोविड-19 चालू आहे, ते एक प्रकारे जैव युध्दच आहे. ते आपण सारेजण मिळूनच परतवून लावू शकतो. सार्‍यांमधे मास्कची ‘मास‘ जागरूकता होणे आवश्यक नव्हे अत्यावश्यक आहे. सर्व विक्रेत्यांकडे ठळक दिसणारे मास्क सर्वांना अपरिहार्य हवेतच. स्थानिक जबाबदार जाणकारांनी लक्ष ठेवणे तसेच त्रुटींकडे संबंधितांचे लक्ष वेधणे अतिशय गरजेचे आहे. भारतीय सैन्य संख्येने काही लाखांत असले तरी, प्रत्येक गल्लीबोळाचा विचार करता ते अपुरे आहे. आणि मग देशाच्या सीमा कोणी राखायच्या की उघड्या ठेवायच्या? वेळ नाजूक आणि अदृश्य वैर्‍या (कोविड विषाणू) आहे. म्हणू्न उच्च दर्जाचा समजूतदारपणाच आपल्याला यातून सुखरुप पैलतीरावर नेईल. जैविक युध्द गल्लीबोळ, दारापर्यंत आलंय. त्याला, लष्कर नव्हे स्थानिकांनी परतवून लावायचंय. सरकार बाधितांची काळजी घेत आहेच. स्थानिकांनीही आपली जबाबदारी उचललीच पाहिजे. उरलेल्या दिवसांत या जबाबदारी ज्ञानयज्ञाची सांगतां आपल्याला करायची आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा या सार्‍यांच्या पलीकडे जाऊन. आहेत ना सारे स्थानिक सोबत? की तू हो पुढे, मी आलोच… असेच सुरू राहणार?

-नितीन देशमुख

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply