Breaking News

लसीकरण मोहिमेसाठी नेरळ भाजप सरसावला; आरोग्य विभागाला मदत

कर्जत : बातमीदार

नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वरील व्यक्तींना कोविड लसीकरण केले जात आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला नेरळ भारतीय जनता पक्षाकडून मदत केली जात आहे. नेरळ भाजपचे कार्यक्रते लसीकरण करण्यासाठी आलेल्या लोकांना चहा, पाणी तसेच काही कार्यकर्ते ऑनलाईन अर्ज नोंदणी कामात मदत करीत आहेत. कर्जत तालुक्यात नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकातील डॉ. सागर काटे आणि डॉ महेंद्र दाढवड तसेच सुभाष चव्हाण, सी. एच. पिंगळा, आरोग्य सेवक डी. एन. पवार, बी. बी. कवळे, जी. एस. बावने, एस. आर. बाळसराफ, वाय. एम. नवाळे हे शासकीय कर्मचारी सतत काम करत आहेत. पण लसीकरण करून घेण्यासाठी येणार्‍यांना नेरळचे भाजप कार्यकर्ते मदत करीत आहेत.तसेच आरोग्य विभागाच्या पथकाला ते ऑनलाइन कामात मदत करीत आहेत. नेरळ केंद्रावर येणार्‍या नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून देणे, कोविड लसीकरणाबाबत माहिती देणे अशी कामे भाजप कार्यकर्ते करीत आहेत. या सहाय्यता केंद्रात भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस मृणाल खेडकर, भाजप नेरळ जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष संदीप म्हसकर, उद्योग सेलचे कार्यकर्ते सदस्य योगेश ठक्कर हे आपल्या सहकार्‍यांसह उपस्थित असतात. भाजपच्या आरोग्य पथक मदत केंद्रामुळे नेरळ आरोग्य केंद्रातील आरोग्य पथकाला ऑनलाइन आणि लसीकरण कामात मदत होत आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply