Breaking News

लॉकडाऊनमधून व्यापार्यांना शिथिलता द्यावी; नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे पेण तहसीदारांना निवेदन

पेण : प्रतिनिधी

कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होत असून या निर्बंधातून त्यांना दोन तास शिथिलता द्यावी, अशी मागणाी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेणच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. मागील लॉकडाऊनच्या परिस्थितीतून सावरून व्यापारी वर्गाने लग्नसराई, यात्रा-उत्सवासाठी मालाचा साठा केला होता. मात्र कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार पेण नगर परिषदेने अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पेणमधील व्यापारी प्रतिनिधींनी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या वेळी मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह कन्हैया पुनमिया, किर्तीकुमार बाफना, हेमेंद्र जैन, जिग्नेश जैन, आशिष जैन, सुरेश संसारे व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत असणारे व्यापारी व सामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यात नव्या निर्बंधामुळे जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे, असे व्यापारी प्रतिनिधींनी या वेळी नगराध्यक्षा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. व्यापारी वर्गाच्या भावना लक्षात घेऊन, सर्व दुकाने  किमान दोन तास उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण तहसीलदार अरुणा जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाविषयी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना आहेत. त्यामुळे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवून त्यांच्या आदेशानुसार तजवीज केली जाईल, असे तहसीलदार जाधव यांनी  या वेळी सांगितले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply