Saturday , June 3 2023
Breaking News

विकासकामांना विरोध करून अस्तित्व टिकवण्याचा शेकापचा केविलवाणा प्रयत्न

  • सभागृह नेते परेश ठाकूर यांची टीका
  • तोंडरेत पावसाळी नाल्याचे भुमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्ष विकासकामांना विरोध करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याने त्यांची दुर्दशा झाली असल्याची टीका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 12) केली. तोंडरे येथे महापालिकेच्या माध्यमातून एक कोटी 26 लाख रुपये खर्चून पावसाळी नाल्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास होत आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’मधील तोंडरे गावातील वरचा पाड्यात बामा भिवा पाटील यांच्या घरापासून ते खालच्या पाड्यातील सोपान बाळाराम पाटील यांच्या घरापर्यंत एक कोटी 26 लाख रुपयांच्या पावसाळी पाण्याच्या नाल्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रभाग समिती ‘अ’चे माजी सभापती शत्रुघ्न काकडे आणि भाजप कार्यकर्ते महेश पाटील यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे.
विकासकामाच्या भूमिपूजन समारंभास महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना कदम, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खानावकर, पडघ्याचे माजी सरपंच कृष्णा पाटील, भाजप नेते प्रकाश खैरे, अशोक साळुंखे, ज्ञानेश्वर डोंगरे, युवा नेते महेश पाटील, तोंडरे गावचे माजी उपसरपंच श्रीनाथ पाटील, बूथ अध्यक्ष अभिमन्यू पाटील, युवा कार्यकतेर्र् मेघनाथ पाटील, संदीप पाटील, धनाजी पाटील, हरिश पाटील, रोशन पाटील, अरुण पाटील, बाळाराम पाटील, मोहन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भाषणात सभागृह नेते परेश ठाकूर पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा नेहमीच विकासकामांना प्राधान्य देत असतो. नागरिकांना सुविधा देण्याचे काम करीत आहे. यात शेकापकडून अडथळा आणला जातो, मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही अडथळ्यांना भाजप घाबरत नाही. विकासकामांमुळेच भाजपने सर्व नागरिकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे. आम्ही जनतेसाठी कामे करीतच राहणार.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply