Breaking News

मुंबईला जाणार्यांचे प्रवास थांबवावेत

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक मुंबई येथे कामास्तव जाणार्‍या लोकांचे प्रवास थांबविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.

नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील आढळलेली कोविड 19च्या रुग्णांपैकी 90% रुग्ण हे मुंबई येथे कामास्तव, सरकारी किंवा निमसरकारी या क्षेत्रात काम करताना आढळून आलेले आहेत. मुंबई व इतर शहरामध्ये कोरोना रुग्ण यांचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. व त्यांचा परिणाम आपल्या पनवेल शहरालाही होऊ शकतो. म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक मुंबई किंवा इतर शहरांमध्ये जाणार्‍या लोकांचा प्रवास थांबविणे महत्वाचे आहे. त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात तसेच, काही दिवसांसाठी पनवेल महानगरपालिकेची हद्द बंद करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका वाघमारे यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply