मुंबई : प्रतिनिधी
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पराभवाने निराश झालेल्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. पुढील महिन्यात सुरू होणार्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेत सचिन खेळणार आहे. त्याच्यासह वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा आणि मुथय्या मुरलीधरन हे दिग्गजही क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहेत.
कोरोना व्हायरसमुळे केवळ चार सामने खेळवल्यानंतर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचा पहिला हंगाम स्थगित करण्यात आला होता. महान फलंदाज सुनील गावसकर हे या सीरिजचे कमिशनर, तर सचिन तेंडुलकर सदिच्छादूत होता. देशातील रोड सेफ्टीचे महत्त्व पटवून देण्यासाठी या सीरिजचे आयोजन करण्यात येत असते.
या सीरिजमध्ये यंदा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि भारताच्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धा 2 ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पहिल्या मोसमाचे सामने खेळवण्यात आले होते, परंतु आता सर्व सामने छत्तीसगड येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …