Breaking News

दुकाने बंद, मात्र वर्दळ सुरू राज्य शासनाचा संभ्रमित निर्णय

उरण : प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनचे नियत गोंधळ निर्माण करणारे असल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आलेली असली तरी  फेरीवाल्यांच्या गाड्या, नागरिकांची वर्दळ सुरू आहे. उरणमध्येही असेच वातावरण पहावयास मिळत आहे. पोलिस व नगर परिषद प्रशासनाने शहरातील दुकाने सक्तीने बंद केली असली, तरी रस्त्या लगतच्या फेरीवाल्यांच्या गाड्या सुरू असून, शहरातील वर्दळ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पर्यायाने अशाने कोरोनाला कसा प्रतिबंध होईल, असा सवाल जनताच विचारू लागली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र कडक निर्बंध सुरू केले आहेत.त्याप्रकारची अंमलबजावणी उरण शहरातही सुरू झाली असली तरी उरण मधील गर्दी कमी होताना दिसत नाही. जनता बाजारपेठेत येत असल्याने व्यापार्‍यांनी आपली दुकाने सुरू करताच पोलीस यंत्रणा सक्तीने दुकाने बंद करीत आहे, मात्र रस्त्यावरील हातगाड्यांवर खुलेआम विक्री होताना दिसत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply