माणगाव : प्रतिनिधी
कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या दुसर्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 19) सकाळपासूनच माणगाव बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली.
वीकेण्ड लॉकडाऊननमुळे माणगाव बाजारपेठेत दोन दिवस शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनी सुनी वाटत होती. सोमवारी सकाळी आपल्याला लागणार्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक माणगाव बाजारपेठेत आले होते. किराना माल, फळे, भाजीपाला आदि दुकानांत ग्राहक अधिक प्रमाणात दिसत होते. पोलीस व माणगांव नगरपंचायतीचे कर्मचारी नागरिक व दुकानदारांना सूचना देत होते.
नागरिक व दुकानदारांनी कोविड नियमांचे पालन करून शासन व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.