Breaking News

कोरोनावाढ रोखण्यासाठी आयपीएलबंदी अयोग्य

पॅट कमिन्सचा दावा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीन लाखांच्या घरात वाढत आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2021 सुरू असल्यामुळे अनेक जण टीका करीत आहेत, पण आयपीएल बंद करणे हा कोरोना संकट रोखण्यासाठीचा उपाय नाही, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स याने व्यक्त केले आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज पॅक कमिन्सने भारताच्या या कोरोना लढ्यात मदतीचा हातभार लावला. त्याने पंतप्रधान फंडात 50 हजार डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख रुपये दान केले. ही रक्कम ऑक्सिजन खरेदीसाठी वापरण्यात यावी, असे आवाहनही त्याने केले.

आयपीएल रद्द करणे हे कोरोना संकट रोखण्यावरचे उत्तर नाही. फ्रंटलाइन कर्मचार्‍यांवर कोणताही अधिकचा भार येणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आयपीएल रद्द करणे हा उपाय नाही. या संकटात प्रत्येक दिवशी सामना खेळून तीन-चार तास का होईना लोकांना घरी बसवून ठेवतो. त्याचा कोरोना संसर्ग रोखण्यात थोडासा हातभारही लागत असावा. त्याने लोकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलते, असे कमिन्स म्हणाला.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply