मिलान ः वृत्तसंस्था
इंटर मिलानने गेल्या 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच सेरी-ए फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत युव्हेंटसची नऊ वर्षांपासूनची मक्तेदारी मोडीत काढली.अँटोनियो कोन्टे यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणार्या इंटर मिलानचे हे 19वे जेतेपद ठरले. अॅटलांटाला सासुओलोविरुद्ध 1-1 अशी बरोबरी पत्करावी लागल्याने इंटर मिलानने चार सामने शिल्लक राखून 13 गुणांची आघाडी घेतली आहे. चार सामन्यांआधीच जेतेपद निश्चित झाल्यानंतर मिलान शहरात सर्व चाहत्यांनी चौकात एकत्र येत कारचे हॉर्न वाजवून जल्लोष केला. हजारो चाहत्यांनी पिआझ्झा डुओमो येथे एकत्र येऊन जोरजोरात घोषणा देत इंटर मिलानच्या विजयाचा आनंद साजरा केला.