Breaking News

वाळू वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई

महाड : प्रतिनिधी

तालुक्यात टोळ फाटा ते बंदर यादरम्यान मंगळवारी

(दि. 4) वाळू वाहतूक करणार्‍या पाच वाहनांवर महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे या परिसरात अनधिकृत वाळू व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. महाड खाडीपट्टा विभागातील टोळ फाटा ते बंदर यादरम्यान मंगळवारी रात्री 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या दोन पिकअप आणि तीन डम्पर पकडले. प्रत्येक वाहनात दोन ब्रास वाळू अशी एकूण 10 ब्रास वाळू आढळून आली. या प्रकरणी वाहनांचे मालक फैसल हनीफ इसाने आणि इम्रान वजगरे यांच्याकडून तीन लाख आठ हजार 650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे चंद्रसेन पवार यांनी सांगितले. या कारवाईमुळे परिसरात अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply