Breaking News

होम क्वारंटाइन रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन

पनवेल ः प्रतिनिधी

कोरोनाच्या हाहाकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपचे कोकण प्रदेश ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष सितेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेत श्रीमंगलेश्वरी माता मंदिर सेक्टर 6, कळंबोली व अजिंक्यतारा मित्रमंडळ कळंबोली यांच्या वतीने तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीच्या कोविडबाधित होम क्वारंटाइन रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरची सेवा पुरविण्याचे सत्कर्म सुरू केले आहे.

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सितेंद्र शमा यांनी गरजू व प्रतिभावंत विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रमही राबविला. या स्तुत्य कार्यक्रमाचा अनेकांनी लाभ घेऊन उदंड प्रतिसाद दिला. दर्शन भाई, सौरभ, सोनू मेनन, पवन, रूपेश चव्हाण, चंद्रकांत ढवले, शरद मेनन या युवा कार्यकर्त्यांनी या कामी विशेष मेहनत घेतली. कळंबोली परिसरातून उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. सितेंद्र शमा यांच्या कार्यापासून अनेकांनी प्रेरणा घेत अशी सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहे.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply