Breaking News

पनवेलपेक्षा अलिबागमध्ये उपचाराधीन रुग्ण जास्त

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनोबाधितांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 9) सलग तिसर्‍या दिवशी एक हजारहून कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांत तब्बल 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 908 जणांना कोरोनाची लागण झाली. सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 620वर पोहचली. दिवसभरात एक हजार 20 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. पनवेल महापालिकेपेक्षा अलिबागमध्ये उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. रायगड जिल्ह्यात 24 तासांत 908 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात पनवेल मनपा हद्दीतील 222, पनवेल ग्रामीण 132, उरण 50, खालापूर 53, कर्जत 38, पेण 63, अलिबाग 164, मुरूड 14, माणगाव 34, रोहा 63, सुधागड आठ, महाड 55 आणि पोलादपूर व श्रीवर्धनमधील प्रत्येकी सहा जणांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत नऊ, अलिबाग तीन, कर्जत व पोलादपूर प्रत्येकी दोन आणि खालापूर एक अशा एकूण 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या 12 हजार 620 कोरोना रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील दोन हजार 857, पनवेल ग्रामीण एक हजार 513, उरण 604, खालापूर 951, कर्जत 423, पेण 705, अलिबाग तीन हजार 462, मुरूड 88, माणगाव 271, तळा 25, रोहा 988, सुधागड 158, श्रीवर्धन 86, म्हसळा 52, महाड 327, पोलादपूर 110 रुग्णांचा समावेश आहे. पनवेल मनपा हद्दीतील रुग्णवाढ नियंत्रणात आली आहे, मात्र अलिबाग तालुक्यात कोरोनावाढ नियंत्रणात नाही. पनवेलपेक्षा अलिबागमध्ये उपचाराधीन रुग्ण जास्त आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply