Breaking News

कबड्डी दिन कार्यक्रम रद्द

मुंबई : प्रतिनिधी

कबड्डीमहर्षि कै. शंकरराव (बुवा) साळवी यांचा 15 जुलै हा जन्मदिवस. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे हा दिवस कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनामुळे  यंदा हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेली 20 वर्षे  कबड्डी दिन साजरा केला जातो. हा कार्यक्रम या वर्षी जरी रद्द केला असला तरी कबड्डी दिन मात्र साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. 15 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वा. मुंबईतील दादर येथील राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयात बुवा साळवींच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. 

सर्व संलग्न जिल्हा संघटनांनीदेखील आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी शासनाच्या आदेशाचे पालन करून कबड्डी दिन साजरा करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply