Breaking News

उरणमधील शिक्षिकांकडून पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला गुरुवारी (दि. 20) उरण तालुक्यातील शिक्षिकांनी एक हात मदतीचा म्हणून वैद्यकीय साहित्यांची मदत केली आहे. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला भेडसावून सोडलेले आहे. या महामारीत अनेक जीवलगांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. उरण तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका असलेल्या मुळेखंड शाळेच्या कल्पना अरुण पाटील, सारडे येथील शाळेच्या ऊर्मिला रमेश म्हात्रे, कोंढारी शाळेच्या समता रामचंद्र ठाकूर, चिरले येथील शाळेच्या शारदा गजानन गायकवाड या चार शिक्षक भगिनींनी आपणही ह्या सामाजाचे देणे लागतो या भावनेतून एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने पनवेल येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये फ्रिज आणि इंजेक्शन्सची मदत केली.  ही मदत शिक्षिकांच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयाचे डॉ. सचिन संकपाळ आणि डॉ. फाळके यांच्याकडे सुपूर्द केली. मदत करणार्‍या चारही शिक्षिकांचे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयाचे डॉ. सचिन संकपाळ यांनी आभार मानले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply