Breaking News

टेरेसवरच उरकला विवाहसोहळा

पुणे : प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक व्यवहार बंद ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. याचा विविध घटकांना फटका बसत असताना विवाह सोहळेदेखील यातून सुटले नाहीत. पुण्यात अशाच एका विवाहसोहळ्याला कार्यस्थळ शोधताना कुंजीर कुटुंबाची अक्षरश: धांदल उडाली आणि अखेर विवाहसोहळा घराच्या टेरेसवर उरकण्यात आला.

पुण्यात घोरपडी येथे राहणार्‍या मनोज कुंजीर यांचा विवाहसोहळा नियोजित करण्यात आला होता, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाची चिन्हे दिसू लागल्याने साधेपणाने आळंदी येथे विवाह करण्याचा विचार कुंजीर कुटुंबाने केला. कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने स्वारगेट येथे असलेल्या एका गणेश मंदिरात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याचे नियोजन केले. लग्नाच्या ऐन दोन दिवस आधी मंदिरेदेखील बंद झाल्याने तेथेही विवाह होऊ शकणार नसल्याने ऐनवेळी कुटुंबाची धांदल उडाली. घराजवळील एक छोटा हॉल मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तोही मिळू शकणार नव्हता. ऐन एक दिवस आधी लग्नसोहळा पुढे ढकलणे शक्य नव्हते. अखेर कुंजीर कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवर लग्नसोहळा उरकण्याचे कुटुंबाने ठरवले.

सातार्‍याहून वधूचे मोजके कुटुंबीय पुण्यात आले आणि मोजक्या 25 ते 30 कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा झाला. लग्नसोहळा ऐनवेळी साधेपणाने झाल्याने कुटुंबाचा हिरमोड झाला खरा, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मोजक्या पाहुण्यांनाच बोलावून का होईना लग्न झाल्याचे समाधान असल्याचे कुटुंबाने सांगितले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply