Breaking News

पनवेलमध्ये प्रथमच ‘अग्रज’ची उत्पादने

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथील शिवाजी रोडवरील सिल्हर अपार्टमेंटमध्ये  प्रथमच पुण्याचे प्रसिद्ध अग्रज फुड प्रोसेसर्सची उत्पादने रोहिणी लिमये आणि शीतल लिमये यांनी पनवेलकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या दुकानाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 5) पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल भूषण डॉ. संजीवनी गुणे यांच्या हस्ते झाले.

संपूर्ण नवी मुंबईत पनवेल येथे प्रथमच हे दुकान सुरू होत असून या ठिकाणी खपली गहू पीठ, राजगीरा पीठ, नाचणी, गहू यांसारख्या विविध धान्यांच्या लाह्या, विविध प्रकारचे पोहे, मसाले, चटण्या, डाएट फुड्स, उपवासाचे पदार्थ असे विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे प्रोप्रा रोहिणी लिमये आणि शीतल लिमये यांनी माहिती देताना सांगितले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply