उरण ः वार्ताहर
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया (एनएचआयए)कडून मंजूर झालेल्या कोप्रोली-खोपटे-चिरनेर रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील खोपटे-कोप्रोली रस्त्याचे काम करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) झाले. या कार्यक्रमास भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, जि. प. सदस्य बाजीराव परदेशी, पं. स. उपसभापती शुभांगी सुरेश पाटील, कोप्रोली ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका सतिश म्हात्रे, उपसरपंच नीरज पाटील, खोपटेच्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी सुरज म्हात्रे, भाजप तालुका सचिव सुनील पाटील, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, ज्येष्ठ नेते प्रदीप ठाकूर, कोप्रोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गिरीष म्हात्रे, माजी पं. स. सदस्य रमाकांत पाटील, कोप्रोली मंदिर कमिटी अध्यक्ष रमेश म्हात्रे, भाजप गाव अध्यक्ष सचिन गावंड, महिला मोर्चा अध्यक्ष निशा म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अच्युत ठाकूर, निलेश पाटील, गजानन पाटील, कल्पेश म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, विकी म्हात्रे, गाव अध्यक्ष हेमंत ठाकूर, भूपेश ठाकूर, जितेंद्र ठाकूर, परशुराम पाटील, चेतन पाटील, दत्तराज म्हात्रे, महेश कोळी आदी उपस्थित होते. भूमिपूजन झाल्यानंतर कोप्रोली गावातील सांडपाणी जाण्यासाठी गटार लाइनची पाहणी करण्यात आली. ते कामही लवकरच सुरू होणार आहे.