मुंबई : प्रतिनिधी
‘वेगवान खेळपट्ट्यांमुळे चेंडू आणि बॅटदरम्यान बरोबरीची लढत रंगते. यामुळे भारताला वेगवान गोलंदाज घडविण्यास मदतही मिळेल. त्यामुळे भारतामध्ये जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजीसाठी पोषक ठरणार्या खेळपट्ट्या तयार झाल्या पाहिजेत,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान ब्रेट लीने, ‘आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेल,’ असे भाकीतही
वर्तविले. वेगवान गोलंदाजांविषयी ली याने म्हटले की, ‘वेगवान गोलंदाजांना फायदा होईल अशी खेळपट्टी बनविण्यासाठी मी मैदान कर्मचार्यांना आवाहन करेन. खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत असले पाहिजे, जेणेकरून वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा मिळेल. थोड्या प्रमाणात गवत असले, तर सामना बरोबरीचा रंगेल. त्याच वेळी ली याने जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध क्रिष्णा आणि नवदीप सैनी यांचेही कौतुक केले.