Breaking News

विशेष गटांची स्थापना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचे पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात एक हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून, मृत्यू झालेल्यांचा आकडा 30च्या घरात पोहोचला आहे. या संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेगवेगळ्या सबलीकरण गटांची स्थापना केली आहे. सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा आणि साधनांचा कसा वापर करता येईल, यासंदर्भात काय तयारी पूर्ण झाली आहे या गोष्टींवर हा गट लक्ष ठेवणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाची एक बैठक रविवारी (दि. 29) झाली. या बैठकीमध्ये कोरोनाविषयक 11 गटांची स्थापना करण्यात आली. या वेगवेगळ्या गटांमध्ये मोदी सरकारमधील वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांचाही समावेश आहे. पहिला गट हा आरोग्यविषयक आप्तकालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी निती आयोगाचे सदस्य असणारे डॉक्टर व्ही. पॉल यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
दुसर्‍या गटाकडे देशातील रुग्णालये, अलगीकरण (क्वारंटाइन) आणि विलगीकरण (आयसोलेशन) कक्षांची उपलब्धता तसेच आजाराचा प्रादुर्भाव किती वाढत आहे, चाचण्या आणि आपत्कालीन उपचार केंद्रे यांच्यासंदर्भात काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर आरोग्य उपकरणे, रुग्णांच्या जेवणाची आणि औषधांची सुविधा, खासगी क्षेत्रातील रुग्णालये, मदत करणार्‍या कंपन्या आणि सेवाभावी संस्थांशी समन्वय ठेवणे, लॉकडाउनसंदर्भातील विषयांकडे लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गटांची स्थापना करण्यात आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply