Breaking News

मुरूडसह रायगडात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन

मुरूड : प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर  राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 17) राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुरूड नगर परिषद कार्यालयाजवळही सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. या वेळी नागरिकांनी भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण देशभक्तीपर बनले होते. मुरूड पालिकेतर्फे आयोजित सामूहिक राष्ट्रगीत गायनावेळी प्रशासक पंकज भुसे, कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, राकेश पाटील, प्रशांत दिवेकर, नरेंद्र नांदगावकर, माजी नगरसेवक अविनाश दांडेकर, संजय वेटकोळी, गोपाळ चव्हाण, अभिजित कारभारी, अभिजीत चांदोरकर, नंदकुमार आंबेतकर, मनोज पुलेकर, चिदानंद व्हटकर, सतेज निमकर विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. सर्वांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply