Breaking News

खारघरमध्ये नियोजनशुन्य पाणीपुरवठा

भाजपकडून सिडकोचा जाहीर निषेध

खारघर : रामप्रहर वृत्त

सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी सिडकोकडे पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजप पदाधिकारी शुक्रवारी (दि. 6) सिडकोचा जाहीर निषेध करणार आहेत.

सिडकोने वेळोवेळी पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत तारीख देऊन खारघरचे सर्व नागरिक तसेच लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली असून शुक्रवारी सकाळी 10 वाजता सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 14 येथे सुरू असलेल्या गृहसंकुलाचे बांधकाम व खारघर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सुरु असलेल्या गृहसंकुलाचे बांधकाम आपण पूर्णपणे बंद पाडुया यासाठी एकत्र यावे, असे आवाहन भाजप खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले आहे.

दर आठवड्याला सोमवारी पाणी साठवण्यासाठी शटडाऊन घेतला जातो तरी खारघरमध्ये पाणीबाणी का? किती दिवस आपण हे सहन करणार आहोत? प्यायला पाणी नाही पण सिडको नवीन प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देत सुटली आहे. फक्त पन्नास टक्के पाणी पुरवठा होतो, मग जनतेने का गप्प बसायचे? हे नवीन प्रकल्प चालू करायचे अशा अकार्यक्षम सरकारच्याविरोधात भाजप खारघर तळोजा मंडळ काम बंद आंदोलन करीत आहे. आपण मोठ्या संख्येने यात सामील व्हावे आणि खोट्या सिडकोला जाब विचारावा. खारघरमधील पाण्यासाठी त्रस्त झालेल्या तमाम जनतेला विनंती असून हीच ती वेळ आहे, सिडकोला ताकदीचा टोला देण्याची. तरी सर्व नागरिकांनी येणार्‍या शुक्रवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सिडको व महाराष्ट्र शासनाला जनतेची ताकद दाखवू, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply