Breaking News

खालापूर महावितरणची पावसाने घेतली परीक्षा

खोपोली : प्रतिनिधी

आठवडाभरापासून कोपलेल्या वरुणराजाने खालापूर वीज वितरण कंपनी (महावितरण) लादेखील हिसका दाखवला असून, ठिकठिकाणचा खंडित वीजपुरवठा सुरळीत करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

खालापूर तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. बुधवारी रात्री कमी वेळात पडलेला प्रचंड पावसाचा अंदाज अनेकांना आला नव्हता. त्यामध्ये महावितरणदेखील होते. खालापूर परिसरातील अनेक भाग पाण्याखाली होते. महावितरणाचे डीबी (डिस्ट्रीब्यूशन बोर्ड) देखील कित्येक तास पाण्याखाली गेले होते. तालुक्यात औद्योगिक पट्टा असल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याने महावितरणची धावपळ झाली होती. त्यातच अपुरी कर्मचारी संख्या, अप्रशिक्षित कर्मचारी, साधनसामग्रीची कमतरता यामुळे कामाचा अतिरिक्त भार वाढला होता.

तालुक्यातील खालापूर महावितरण कार्यालय आणि वावोशी विभाग या दोन्ही विभागात औद्योगिक पट्टा आणि घरगुती वापर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खालापूर महावितरण कार्यालय अंतर्गत नऊ ग्रामपंचायतीत मिळून पंचवीस गावे असून, सुमारे 5700 घरगुती ग्राहक आहे. औद्योगिक भाग असल्याने सुमारे दहा फिडर खालापूर अंतर्गत येतात.

अतिवृष्टीमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. गायकवाड आणि खालापूर विभागाचे अभियंता सचिन धनुधर्मी यांनी कर्मचार्‍यांच्या मदतीने गुरुवारी दिवसभर मेहनत घेतल्याने खालापूर विभागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply