Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल येथील महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या.

पनवेल शहरातून जाणार्‍या उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात आल्याने शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासोबत उड्डाणपुलावर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची दक्षता घेत सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत यांनी संजय कटेकर यांना त्या संदर्भातील सूचना केल्या.

या वेळी भाजपचे उमेश इनामदार, मोतीराम कोळी, पनवेल महापालिकेचे अधिकारी साळुंके तसेच टीआयपीएल कंपनीचे इंजिनियर संतोष कडू उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply