पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील घोट गाव येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीतील घोट गाव, सिद्धी करवले, कोयनावळे, तुर्भे व आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांची वाढती लोकसंख्या पाहता त्यांना कोविड लसीकरण केंद्र उपलब्ध नसल्याने घोट गाव व आजुबाजूच्या गावातील नागरिकांना लसीकरणाकरिता पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली व खारघर अशा जावे लागते. त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होऊन लसीकरणास येणार्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना टोकन घेण्यासाठी तात्कळत रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे गावातील महिला व ज्येष्ठांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने घोट गाव व आजूबाजूच्या गावातील रहिवासी घोट गाव येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्राची उभारणी करण्याची सातत्याने मागणी करीत आहेत.
या अनुषंगाने पनवेल महापालिका प्रशासनामार्फत घोट गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने लसीकरण केंद्राची उभारणी करावी व त्या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकार्यांना द्यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Check Also
वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन
पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …