Breaking News

कोशिश फाउंडेशनकडून ‘सीकेटी’चा गौरव

ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलचे कार्यतत्पर व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात बुधवारी (दि. 18) झाले.
कोशिश फाउंडेशन विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन विविध स्तरावर नेहमीच करीत असते. या फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, त्यांना आपले विचार निडरपणे मांडण्यासाठी आणि उत्कृष्ट वक्ते निर्माण करण्यासाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परेश ठाकूर यांनी यासाठी भव्य ऑनलाइन व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांमधून सुमारे 1300 विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत मुलांना भरघोस अशी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली. या स्पर्धेतील सीकेटी शाळेतील पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना चषक, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास प्राचार्य इंदुताई घरत, इंग्रजी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिंदे, पर्यवेक्षिका नीरजा, सौ. अय्यर, शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
या वेळी बोलताना परेश ठाकूर यांनी देशाला चांगले नेतृत्व मिळण्यासाठी  उत्तम वक्तृत्व व निडरपणा असणे का आवश्यक आहे हे मुलांना समजावून सांगितले व याकरिता तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे सूचित केले. या स्पर्धेचे प्रमुख म्हणून सीकेटी इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी आपली जबाबदारी चोख बजावल्याबद्दल त्यांची परेश ठाकूर यांनी प्रशंसा केली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply