Breaking News

गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे तीन पक्ष सत्तेला चिकटलेत

फडणवीसांचा मविआ सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 23) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तीन पक्षांची युती अनैसर्गिक असल्याची टीका केली तसेच या तीन पक्षांची तुलना त्यांनी गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांशी केले.
मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीचे लोक हे अनैसर्गिक युतीने एकत्र आलेले आहेत. विचारसरणी, विचार, गव्हर्नन्स नाही. केवळ सत्तेला चिकटलेले अशा प्रकारचे हे लोक आहे. ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात त्याप्रमाणे सत्तेला चिकटलेले हे तीन पक्ष. त्यामुळे सत्तेचा वाटा मिळाला नाही की ते ओरड होते. वाटा मिळाला की सगळे बंडोबा थंडोबा होतात.
मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावर फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्याकरता कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. ज्या प्रकारे अधिकार्‍यांच्या पोस्टिंग होत आहेत त्यांना गरिबाकडे पहायला फुरसत नाही. शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष होत आहे. कुठल्याही प्रकारे शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय हे सरकार घेत नाही. आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शेतकर्‍याचा प्रश्न त्याच्या मृत्यूनंतर तरी सोडवला पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply