कर्जत : बातमीदार
प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का, असे वादग्रस्त विधान नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी असंख्य पत्रे भाजप युवा मोर्चाकडून पवारांना पाठविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे कर्जत भाजप युवा मोर्चाकडून पत्रे पोस्ट करण्यात आली.
या अभियानावेळी कर्जत पोष्ट ऑफिस येथे भाजप युवा मोर्चाचे कर्जतमधील पदाधिकारी सर्वेश गोगटे, यश घेवारे, भावेश देवघरे, ऋत्विक आपटे, मिहीर कुलकर्णी, राम ठाकरे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते बोरसे, किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष मंदार मेहेंदळे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, तसेच सूर्यकांत गुप्ता, नितीश धामणकर, समीर सोहोनी आणि इतर अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
खोपोली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना श्रीरामांचे स्मरण करून देण्यासाठी खोपोलीत भाजप युवा मोर्चातर्फे टपाल पेटीत जय श्रीराम लिहिलेली शेकडो पत्रे कार्यकर्त्यांनी टाकून अभियान केले.
यासाठी खोपोलीतील टपाल कार्यालयाजवळ भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, सरचिटणीस विनायक माडपे, उपाध्यक्ष पुनीत तन्ना, महिला आघाडीच्या रसिका शेटे, माजी अध्यक्ष विजय तेंडुलकर, प्रसाद सोमण, गणेश ठाकरे, जयवंत वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …