Breaking News

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी (दि. 29) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 45,083 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 460 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 35,480 जण कोरोनातून बरेही झाले आहेत.

देशात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या ही 3,68,558 इतकी आहे. कोरोनातून बरे होण्याचा वेग हा 97.53 टक्क्यांवर पोहचला आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. पण केरळमध्ये संसर्गाचा वेग वाढत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशात जवळपास 45 हजार रुग्णांची नोंद होत आहे. केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री पिरनाई विजयन यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

देशात गेल्या चार दिवसांपासून 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. याआधी गुरुवारी 46164, शुक्रवारी 44658 आणि शनिवारी 46759 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे कारण केरळ आहे. केरळमध्ये सलग चौथ्या दिवशी 30 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले.

केरळसह महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये करोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोनासंबंधी लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा कालावधी वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत केला आहे.

शनिवारपर्यंत 63 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात 28 ऑगस्टपर्यंत 63 कोटी नऊ लाख 17 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शनिवारी 73.85 लाख नागरिकांनी लस घेतली. तर आतापर्यंत देशात 51 कोटी 86 लाख नागरिकांची कोरोना चाचणी झाली आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply