मुंबई : ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना 31 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून व्हिडीओ शेअर करीत अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. ‘ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 100 कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा 2010, 2012चा पैसा असो अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,’ असे सोमय्या यांनी म्हटले होते.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …